विद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण Principal beat up teachers in front of students

विद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण

विद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण
www.24taas.com, लातूर

लातूर शहरातल्या श्री संत गोरोबा काका प्राथमिक शाळेत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी मुलांसमोर शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

इमारत निधीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं संस्थाचालक सखाराम चव्हाण आणि मुख्याध्यापक सचिन चव्हाण यांनी तीन शिक्षकांना मारहाण केली. विशेष म्हणजे शाळेतच विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळं मात्र विद्यार्थ्यांसमोर शिक्षक कोणता आदर्श ठेवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यातल्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या बेजबाबदारपणाच्या अनेक घटना समोर येत असताना आता लातूरच्या या प्रकारानं शिक्षकांच्या प्रतिमेला आणखीनच धक्का पोहचला आहे.

First Published: Wednesday, January 16, 2013, 16:09


comments powered by Disqus