कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा अजितदादांवर हल्लाबोल, Radhakrushna on Ajit Pawar irrigation money

कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा अजितदादांवर हल्लाबोल

कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा अजितदादांवर हल्लाबोल
www.24taas.com, लातूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. `सिंचनावर ७ हजार कोटी रुपये खर्चून काय उपयोग झाला, राज्यातली जनता मात्र पाण्यासाठी तडफडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.`

`याचं आपण आत्मपरीक्षण करणार काय?` असा रोकडा सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला आहे. धरणं शेतक-यांसाठी की कंत्राटदरांसाठी असंही त्यांनी म्हटलं आहे.

या निमित्तानं नव्या वादाला तोंड फुटलं असून, दुष्काळावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First Published: Friday, March 29, 2013, 20:09


comments powered by Disqus