बीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना Radio blasts

बीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना

बीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या काळेगावमध्ये झालेल्या रेडिओच्या स्फोटात 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओम निंबाळकर या एसटी वाहकाच्या घरी हा स्फोट झालाय.

कुर्ल्याहून सुटलेल्या बसमध्ये हा रेडिओ ठेवण्यात आला होता. या बसचे कंडक्टर ओम निंबाळकर यांनी हा रेडिओ घरी नेला. निंबाळकरांच्या घरातच या रेडिओचा स्फोट झाला. या स्फोटातपासणी करण्यासाठी एटीएस पथकही रवाना झालं.

हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचं जरी सांगण्यात येत असलं, तरी यात निंबाळकर कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, तेथे खड्डा पडला आहे. घराचं छत उडालं आहे आणि भिंतींनाही चरे पडले आहेत. दरवाजा तुटला आहे. दीड किलोमीटर दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज झाला. निंबाळकर कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

First Published: Friday, November 30, 2012, 22:33


comments powered by Disqus