राहुल गांधी आज वर्धा दौ-यावर , Rahul Gandhi today Wardha tours

राहुल गांधी आज वर्धा दौ-यावर

राहुल गांधी आज वर्धा दौ-यावर
www.24taas.com, झी मीडिया, वर्धा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्धा दौ-यावर येत आहेत. सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

यंदा काँग्रेस ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपला जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी सेवाग्रामला काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिति अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसह जवळपास अडीचशे पदाधिका-यांशी ते बैठक घेणार आहेत.

निवडणुक लक्षात घेता पक्षाची ताकत कशी मजबूत करत विजय मिळवता येईल या बाबतीतले मार्गदर्शन राहुल गांधी करणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून तीन ते चार हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.या दौ-यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अधिकारी, कर्मचारी मिळून तब्बल सहाशे पोलीस सेवाग्राममध्ये तैनात करण्यात आलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 08:42


comments powered by Disqus