राज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले Ramdas Athavale on MNS

राज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले

राज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले
www.24taas.com, लातुर

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं संकेत दिल्यानंतर राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते खुले केले नसले तरी महायुतीतील आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची मात्र दरदिवशी वेगवेगळी वक्तव्यं समोर येत आहेत.

काल लातुरात राज ठाकरे महायुतीत आल्यास महायुती भक्कमच होईल. असं वक्तव्य केले. सुरुवातीला त्यांनी राज ठाकरे महायुतीत आल्यास आपण महायुतीतून बाहेर पडू. अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी मनसे शिवसेनेत विसर्जित करुन महायुतीत आल्यास त्यांचे स्वागत करु, असं म्हटलं होतं.

एकूणच राज ठाकरेंना महायुतीत सामावून घेण्याबात आठवलेंची भूमिका मवाळ होताना दिसतंय.

First Published: Sunday, February 3, 2013, 09:09


comments powered by Disqus