Last Updated: Wednesday, October 31, 2012, 08:26
www.24taas.com, उस्मानाबादभाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उस्मानाबादेत राष्ट्रीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, खासदार वरुण गांधी, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ग्रामीण भागातील तरूणांनी राजकारणात पुढे येणं गरजेचं आहे. राजकारणात येऊ पाहणा-या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारींनी महाजनांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक गोष्ट परीपूर्ण होण्यासाठी प्रमोद महाजन झटत असत. महाजन यांच्या भाषणांबद्दल भंडारी यांनी आठवण सांगितली.
राष्ट्रीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचं हे सहावं वर्ष आहे. महाजन यांनी राजकारणात फार मोठी उंची गाठली होती. मात्र वाद-विवाद सारख्या स्पर्धेत चमकूनच त्यांचा राजकारणाच्या दिशेनं प्राथमिक प्रवास सुरु झाला होता. अशा स्पर्धांच्या आयोजनातून तरुणांची सामाजिक, राजकीय जाणीव समृद्ध होण्यास मदत होणार आहे. युवा वर्गातलं नेतृत्व तयार व्हायला ही स्पर्धा पूरकच ठरणार यात शंका नाही.
First Published: Wednesday, October 31, 2012, 08:26