शेजाऱ्यानंच केली चिमुरडीची हत्या, Sejaryananca was killed cimuradici

शेजाऱ्यानंच केली चिमुरडीची हत्या

शेजाऱ्यानंच केली चिमुरडीची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ

यवतमाळ जिल्हाभरात खळबळ उडवून देणाऱ्या तीन वर्षीय गौरी गिरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गौरीच्या घराशेजारी राहणार्याक युवकाने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली, गजानन रमेश मुरमुरे असे आरोपीचे नाव आहे.

महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील गौरी किसन गिरी ही १७ नोव्हेंबर रोजी अचानक घरासमोरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी गावातच बांधकाम सुरू असलेल्या घराच्या तळमजल्यावर तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.

देशभर गौरीच्या खूनाचे पडसाद उमटलेत होते. खूनाचा तपास गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी गौरीच्या घराशेजारी राहणा-या गजानन मुरमुरेची कसून चौकशी केली असता त्या नराधमाने गौरीचा खून केल्याची कबुली दिलीय. वाळुवर खेळण्याच्या शुल्लक कारणावरून गजाननने गौरीचा खून करून, खूनाला नरबळीच रुप देण्याचा प्रयत्न केला होता.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 16:08


comments powered by Disqus