शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, Shivsena and MNS blame game

शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
www.24taas.com, बीड

शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.

शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता असून नाशिक आणि कोल्हापूरच्या नाराजी प्रकरणावरुन त्याची प्रचिती येते असं नांदगावकर म्हणाले. ते बीडमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी नांदगावकरांनी शिवसेनेतले ४० नेते मनसेत येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याला शिवसेनेनं सडेतोड उत्तर देत ४० सोडा एक नेता जरी मनसेत गेला तर तुमचा सत्कार करु असं आव्हान नांदगावकरांना दिलं होतं.

शिवसेनेचे नेते विकावू नसून निष्ठावान असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलंय. आता शिवसेना याला काय उत्तर देते याकडं लक्ष लागलं आहे.....

First Published: Tuesday, January 29, 2013, 16:11


comments powered by Disqus