Last Updated: Thursday, February 14, 2013, 10:41
www.24taas.com, औरंगाबाद ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येलाच औरंगाबादमधील एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रेमीयुगुल नात्याने मावसभाऊ-बहीण होते. त्यामुळे त्याचं लग्न अशक्य असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवली आहे.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा डिप्लोमा करीत होती तर तरूण अहमदनगर येथील रायसोनी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता.
दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तरूणीच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसरीकडे ठरविला होता. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचे समजते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट लिहून ठेवलेली नसल्यामुळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
First Published: Thursday, February 14, 2013, 10:24