Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:15
झी 24 तास वेब टीम, औरंगाबाद निवडणुका आल्यानंतरच उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण येते असा सणसणीत टोला नारायण राणेंनी लगावलाय. कापूस प्रश्नावर शिवसेना शेतकऱ्याची दिशाभूल करतेय, उद्धव ठाकरे य़ांनी आधी शेतीचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे अशी टीका नारायण राणेंनी औरंगाबादेत केलीय. कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळाला पाहिजे अशी आघाडी सरकारची भूमिका आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला भाव नाही अशी परिस्थितीत शेतकऱ्यांना 7 हजार भाव देणार तरी कसा असा सवाल राणेंनी केलाय आणि अप्रत्यक्षपणे कापसाला भाव देण्यास विरोध दर्शवलाय. शिवसेनेची कापूस दिंडी हा केवळ निवडणूकीसाठी स्टंट असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
First Published: Thursday, December 1, 2011, 17:15