बीडमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू - Marathi News 24taas.com

बीडमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू

www.24taas.com, बीड
 
बीडमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. डॉ. सुदान मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असतानाच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
 
डॉ. सुदान मुंडे  यांच्यावर गर्भलिंग निदानाप्रकरणी कारवाई झाली होती त्याच सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्येच हा प्रकार घडल्यानं लोक संतप्त झाले आहेत. विजयमाला व्हटेकर असं मृत  झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला धारुर तालुक्यातल्या भोपा गावातली आहे. या महिलेल्या चार मुली असल्याने ती गर्भपात करुन घेण्यासाठी सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये आली होती, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान,  या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र, पोलिसांनीच  पुढाकार घेऊन या प्रकरणी गुन्हा दखल केला.
 
सुदाम मुंडे यांच्यावर याआधी गर्भलिंग परिक्षणाप्रकरणी कारवाई करून त्यांचा परवाना रद्द केला होता.  असे असताना हा प्रकार उघड झाल्याने बीडमध्ये संताप वक्त होत आहे. गतवर्षी ‘लेक लाडकी’ या अभियानाच्या माध्यमातून सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची चोरी उघड झाली होती.

First Published: Saturday, May 19, 2012, 12:10


comments powered by Disqus