Last Updated: Saturday, May 19, 2012, 22:40
www.24taas.com, बीड 
बीड जिल्ह्यातल्या परळीत गर्भपात करताना महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना जामीन मंजूर झाला आहे. गर्भपातासारखं गंभीर प्रकरण असतानाही डॉक्टर २४ तासाच्या आत जामीनावर सुटला आहे.
पोलिसांनी उपचारात निष्काळजीपणा आणि पुरावा नष्ट करण्याचे कलम लावल्यानं डॉक्टरला जामीन मिळायला मदतच झाली. एकंदरीतच कठोर कलमं लावली नसल्याचा डॉक्टरला फायदा झाला.
गर्भपात केंद्राचा परवाना रद्द झालेला असतानाही डॉक्टर सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये बिनबोभाटपणे गर्भपात केले जात होते. एकंदरीतच कायद्यात कठोर तरदूदी नसल्यामुळं मुंडेसारखे डॉक्टर पुन्हा समाजात ताठ मानेनं फिरायला मोकळे झाले आहेत.
First Published: Saturday, May 19, 2012, 22:40