Last Updated: Tuesday, May 22, 2012, 17:22
www.24taas.com, नंदूरबार 
राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्य व्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदूरबारचा नियोजित दौरा रद्द केला आहे. अण्णांना थकवा जाणवू लागल्य़ानं त्यांनी नंदूरबारला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अण्णा उद्या वैद्यकीय तपासणीसाठी नाशिकला जाणार आहेत. सततच्या दौऱ्यामुळं अण्णांना थकवा जाणवत असल्यानं दौऱ्यादरम्यान वैद्यकीय तपासणीच्या पर्यायाची टीम अण्णांकडून चाचपणी सुरु होती.
त्यानंतर याबाबत २३ तारखेला अण्णांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढील दौरा अण्णा चालू ठेवणार की, तब्येतीच्या कारणामुळे करणारच नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Tuesday, May 22, 2012, 17:22