Last Updated: Tuesday, May 22, 2012, 23:10
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबाद शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी आता महत्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या काही दिवसांत शहरात मंगळसूत्र चोरांनी उच्छाद मांडलाय. त्याच पार्श्वभूमीवर तातडीने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरुही करण्यात आलंय. सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवून गुन्हेगारी कमी होणार नाही तर पोलिसांनी जागरूकपणे काम केल्यावरच गुन्हेगारी कमी होईल.
नागरिकांची भावना आहे की, पोलिसांनीही योग्यरितीने काम करायलं हवं. तसंच मंगळसूत्र चोरांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापेक्षा तपास योग्य पद्धतीने करावा अशी मागणी नागरिक करता.
First Published: Tuesday, May 22, 2012, 23:10