Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:51
www.24taas.com, परभणी 
परभणी जिल्ह्यातल्या सातोना-उस्मापूर स्टेशनवर उभ्या असलेल्या नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात झाला आहे. पॅसेंजरला एका इंजिननं धडक दिल्यानं १०० प्रवासी जखमी झाले आहेत.
तर इंजिनचालक गंभीर जखमी झाला आहे. २५ डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचलं आहे. अपघात हा इंजिनने धडक दिल्यामुळे झाला असला तरी त्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
अपघात जवळजवळ १०० प्रवासी जखमी झाले आहेत, जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
First Published: Thursday, May 24, 2012, 17:51