आरोपी सलीम कुत्ताचा जेलमध्ये गँगवार - Marathi News 24taas.com

आरोपी सलीम कुत्ताचा जेलमध्ये गँगवार

Tag:  
www.24taas.com, औरंगाबाद 
 
हर्सूल मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील खतरनाक आरोपी सलीम कुत्ता व त्याच्या गँगने कैदी सचिन तायडे व डॉ. सचिन पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये सचिन तायडे हा गंभीर जखमी झाला आहे.
 
मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी पवन शर्मा याने सलीम कुत्ता याच्या इशार्‍यावरून सचिन तायडे याच्यावर धार लावलेल्या चमच्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सचिनला १९ ते २0 टाके बसले आहेत. या प्रकरणानंतर तुरुंगाधिकार्‍यांनी हे प्रकरण बाहेर जाऊ नये यासाठी सचिनवर तुरुंगातच उपचार करण्याचा निर्णय घेतला.
 
मात्र आपणास उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी हॉस्पिटल) नेले नाही तर भिंतीवर डोके आपटून जीव देईन, अशी सचिन तायडे याने धमकी दिल्यामुळे तब्बल तीन तासांनंतर सचिनला घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉ. सचिन पवार यास या हल्ल्यात लाथा-बुक्क्याने मारहाण झाली आहे. पण त्याला घाटीत आणले नव्हते.
 
 
 
 

First Published: Monday, May 28, 2012, 11:50


comments powered by Disqus