अशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! - Marathi News 24taas.com

अशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!

झी २४ तास वेब टीम, नांदेड
 
नांदेडमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार असा संघर्ष सुरू झालाय. निवडणुकीच्या प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या दबावाखाली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
 
नांदेडमध्ये मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात येत असल्याची तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. प्रशासनावर दबाव आणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पडलेल्या विरोधकांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे आरोप करत असून ते बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असाच वाद सुरू राहिल्यास आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो.

First Published: Monday, December 5, 2011, 03:33


comments powered by Disqus