पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक - Marathi News 24taas.com

पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक


www.24taas.com, औरंगाबाद
 
 
औरंगाबाद इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या (गणित, तृतीय सत्र) पेपरफुटी प्रकरणाचा अखेर तपास लागलाय. याप्रकरणी विद्यापीठाचा कर्मचारी सचिन साळुंकेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन हा विद्यापीठातील स्ट्राँगरुममध्ये मदतनीस म्हणून काम करीत होता.
 
या स्टाँगरुममध्येच सर्व पेपर ठेवले जातात. केवळ पाच हजाराच्या अमिषापोटी सचिनने हा पेपर फोडला. पोलिसांनी अवघ्या आठवडाभरातच या पेपरफुटीचा तपास लावला. आणि पेपर फोडणा-याला गजाआड केलंय. मात्र हा पेपर या कर्मचा-यानं कुणाच्या सांगण्यावरून फोडला हे मात्र तपासात उघड झालं नाही, मात्र पेपरफुटी प्रकऱणाचा तपास लागल्यानं आणि विद्यापीठातील कर्मचा-यानंच पेपर फोडल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नावाला काळिमा फासला गेलाय.. आणि विद्यापीठाच्या संशयानुसार पेपर उस्मानाबादला फुटला या शक्यतांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
 
आठ हजारांत फोडला पेपर फोडला गेल्याचे सांगण्यात आले आहे. या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी सात जणांना अटक केली. यात विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या अस्थायी शिपायासह ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी  पत्रकार परिषदेत शिपाई , विद्यार्थ्यास अटक केल्याचे सांगितले. उर्वरित ५  विद्यार्थी नंतर गजाआड करण्यात आले. दरम्यान, दोषींची संख्या शंभरावर जाण्याच्या आयुक्तांच्या वक्तव्यावरून प्रकरणाचे धागेदोरे दूरवर पसरल्याचे स्पष्ट झाले.
 
पेपर फुटल्याचे  २२ मे रोजी  निदर्शनास आले. त्यानंतर परीक्षा नियंत्रक, पेपर सेटर समितीचे अध्यक्ष, उपकुलसचिवाची चौकशी झाली. अटक मात्र शिपाई, विद्यार्थ्यांना झाली. यावर बडे मासे गळाला लागले नाहीत काय, असा सवाल पत्रकारांनी केला असता आयुक्त म्हणाले, ‘तुमच्या मनातली शंका आमच्या मनातही आहे. तपास इथेच संपलेला नाही.
 
पेपरफुटीप्रकरणी २५  मे रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी परीक्षा नियंत्रक डॉ.अशोक चव्हाण यांच्यासह २६ जणांची चौकशी केली. त्यापैकी २२ जण परीक्षा विभागाचे असून,  स्ट्राँग रूममध्ये कार्यरत सचिनने २३ मेचा पेपर २० रोजीच बाहेर आणला होता. घराशेजारील अभियांत्रिकीच्या रणजीत या मित्राच्या सांगण्यावरूनच पेपर फोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रणजीत द्वितीय वर्षात शिकतो, पण प्रथम वर्षांच्या चार मित्रांसाठी प्रश्नपत्रिका फोडण्याचे त्याने सचिनला सांगितले होते. या कामासाठी त्याला प्रत्येकी २ हजारप्रमाणे ८ हजार रुपयेही देण्यात आले. पैशांच्या लोभापोटी हे कृत्य केल्याची कबुली सचिनने दिली.
 
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिपाई सचिन साळुंके (३५, बेगमपुरा), एव्हरेस्ट कॉलेजचा रणजित वायसळ (२२, द्वितीय वर्ष), अफसर आशीर ख्वाजा सरताजोद्दीन (२०, रशिदपुरा), मंदार सोनटक्के (१९ सिडको एन-२),  रत्नदीप मेश्राम (१९, जयसिंगपुरा), करण ओव्हळ (२०, गुरू गणेशनगर), जीवन जाधव (२०, गारखेडा) यांचा समावेश आहे.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Saturday, June 2, 2012, 09:17


comments powered by Disqus