फरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया - Marathi News 24taas.com

फरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया

www.24taas.com, बीड 
 
स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी  डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.
 
डॉ. सुदाम मुंडेकडे कोट्यवधींची माया असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. डॉ. मुंडे परिवाराच्या नावावर सुमारे १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुंडे परिवाराची बँकांमध्ये ४० खाती असल्याची धक्दादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झालीय. कोर्टात पोलिसांतर्फे मुंडेच्या संपत्तीचे विवरण देण्यात आलं, त्यात ही माहिती देण्यात आलीय.
 
मुंडे परिवाराच्या नावावर सुमारे १४५ एकरज जमीन आहे. तसचं ४ बंगले, ४ प्लॉट्स तर औरंगाबादेत मुंडे परिवाराच्या नावे ३  फ्ल्टॅट्स असल्याचंही समोर आले आहे. स्त्री भ्रूण हत्येसारख्या गैरमार्गाचा वापर करुन डॉ. मुंडे याने किती काळी माया जमवली हे, याचं हे उदाहरण  असल्याने पोलीस  अधिक चौकशी करीत आहेत.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Monday, June 4, 2012, 18:56


comments powered by Disqus