Last Updated: Wednesday, December 7, 2011, 05:44

झी २४ तास वेब टीम, जळगाव
जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उपाध्यक्ष अनिल चौधरीला पोलिसांनी हद्दपारीचे आदेश दिलेत.
अनिल चौधरीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने प्राताधिकारी राहुल मांडके यांनी त्याच्या हद्दपारीचे आदेश दिलेत. बाजारपेठ पोलीसांनी चौधरीच्या घरी जाऊन नोटीस बजावली. मात्र, चौधरी यावेळी भेटला नाही.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. अनिल चौधरी हा भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा भाऊ आहे. अनिल चौधरीला २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलंय.
चौधरीला पोलिसांनी हद्दपारीचे आदेश देण्यात आल्यांने राष्ट्रवादी कॉँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असल्याने विरोधकांना प्रचारासाठी आयते कोलीत सापडले आहे.
First Published: Wednesday, December 7, 2011, 05:44