डॉ. माधव सानपला पोलीस कोठडी - Marathi News 24taas.com

डॉ. माधव सानपला पोलीस कोठडी

www.24taas.com, बीड
 
बीडमधल्या डॉ. माधव सानपला औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलीय. त्याला औरंगाबादमध्ये नातेवाईकाच्या घरून अटक करण्यात आली. त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
भगवान हॉस्पिटलचा परवाना रद्द केलेला असतानाही सानपनं हॉस्पिटल सुरू ठेवलं होते. दोन वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. तेव्हा त्याच्या हॉस्पिटलचा परवाना रद्द झाला होता. जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी धडक मोहिम राबवायला सुरूवात केलीय.
 
सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकले जात आहेत. तसंच दोषी आढळलेल्यांना गजाआड केलं जात आहे. मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या डॉ. माधव सानपलाही अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय.

First Published: Sunday, June 10, 2012, 18:22


comments powered by Disqus