मनसेचा आरोप, एस.टी. डेपोच्या डिझेलमध्ये भेसळ - Marathi News 24taas.com

मनसेचा आरोप, एस.टी. डेपोच्या डिझेलमध्ये भेसळ

www.24taas.com, लातूर
 
एस. टी. महामंडळाच्या लातूर डेपोमध्ये डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. मनसे कार्यकर्त्यांनी डेपोतील डिझेल पंपावर धाड टाकत पंपातील डिझेल पुरवठा अधिका-यांच्या समक्ष तपासलं.
 
यामध्ये डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात रॉकेलची भेसळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केलीये. पुरवठा विभागाने डिझेलचे नमुने सील केले असून तपासणीसाठी ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत.
 
एस. टी. महामंडळाच्या सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी अशी कुठलीही भेसळ होत नसल्याचा दावा केलाय. तर यामागे मोठं रॅकेट असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

First Published: Wednesday, June 13, 2012, 08:44


comments powered by Disqus