लातूर बसस्थानकात स्फोट - Marathi News 24taas.com

लातूर बसस्थानकात स्फोट

www.24taas.com, लातूर
 
लातूर शहरातील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानकाच्या कॅंटीनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली.
 
कॅंटीनमध्ये सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आगीने पेट घेतला आणि त्यानंतर मोठा भडका उडून कॅन्टीनला आग लागली. काही वेळानंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याने कॅंटीनसह बसस्थानकालाही हादरा बसला. त्यानंतर प्रवाशी आणि कर्मचा-यांची एकच पळापळ झाली.
 
आग लागल्यामुळे अनेकजण इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी ही आग अखेर आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

First Published: Thursday, June 14, 2012, 11:07


comments powered by Disqus