Last Updated: Thursday, June 14, 2012, 15:46
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबादमधील अर्धापूर येथे माणूसकिला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एक वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
इंदिरानगर भागातील एका अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत होते. आरोपी रानबा तुकाराम शेळके याने मुलीला पोटाचा आजार कमी करतो, माझ्याकडे याचं औषध आहे. असे सांगून घरी नेले व बलात्कार केला.
त्यानंतर सलग ६ ते ७ महिने वृद्धाने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी ४ महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली.
First Published: Thursday, June 14, 2012, 15:46