Last Updated: Thursday, December 8, 2011, 07:29
झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद सार्वजनिक ठिकाणावरील धुम्रपान बंदीचा कायदा सर्वत्रच धाब्यावर बसवला जातोय. मात्र औरंगाबादेतल्या एन फोर या भागातल्या नागरिकांनी धुम्रपान बंदी सुरू केलीय. पोलिसांच्या मदतीशिवाय हा उपक्रम तिथं राबवला जातोय.
धुम्रपान करणारं टोळकं कोणत्याही शहरात आपल्याला दिसतं. बंदी असतानाही सार्वजनिक ठिकाणावर कश मारले जातात. अनेकदा यातून छेडछडीचे प्रसंगही घडतात. मारामारीपर्यंत मजल जाते. त्यामुळं हा प्रकार रोखण्यासाठी शहरातल्या एन फोर भागातल्या नागरिकांनी हा परिसर धुम्रपान मुक्त करण्याचा विडा उचलला. त्यासाठी सिगरेट विक्री आणि धुम्रपानावर प्रतिबंध घालण्यात आला.
परिसरात सिगरेट विक्री बंद झाल्यानं धुम्रपानासाठी जमणारं टोळकं गायब झालं. छेडछाडीसारखे प्रकार बंद झाले. परिणामी या उपक्रमाचं समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झालं.धुम्रपानासारखं आरोग्याला घातक व्यसनाला हे कायद्यानं नव्हे तर समाजाच्या पुढाकारानं आळा घातला जाऊ शकतो, हेच यातून दिसून येतं.
First Published: Thursday, December 8, 2011, 07:29