Last Updated: Sunday, June 17, 2012, 23:37
www.24taas.com, बीड परळीतल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकऱणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे रात्री 9 वाजता परळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. उद्या सकाळी त्यांना परळी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंडे काल संध्याकाळपर्यंत परळीमध्येच होता.तो लपला असललेल्या लॉजची बिले पोलिसांच्या हाती लागली आहेत. ड्रायव्हरच्या नावावर मुंडेंन खोली बुक केली होती.
परळी येथील गर्भपात प्रकरणी फरार असलेल्या डॉ. सुदाम मुंडे यांच्या घराची पोलिस प्रशासनाने झडती घेतली. सीआरपीसीच्या कलम 100 अन्वये न्यायालयाने मुंडे यांच्या घराची झडती घेण्याची परवानगी पोलिसांना दिली होती.
अंबाजोगाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी स्वाती भोर यांच्या पथकानं दिवसभर मुंडे यांच्या घराची झडती घेतली. ठोस पुरावे हाती लागले की नाही याबाबत पोलीसांनी गुप्तता पाळली आहे.
First Published: Sunday, June 17, 2012, 23:37