नोट फॉर व्होटने अशोक चव्हाण अडचणीत - Marathi News 24taas.com

नोट फॉर व्होटने अशोक चव्हाण अडचणीत

झी २४ तास वेब टीम, नांदेड


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच नोट फॉर व्होटचे प्रकरण घडल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
 
नांदेडमध्ये एका अलिशान होंडा जाझ कारमधून चार लाख ९३  हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. अर्धापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे पैसे वापरले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
 
 
याप्रकरणी दिनेश बाहिती आणि कारच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही कार पकडून दिली. काँग्रेस कार्यकर्त्याची ही कार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. शेख जमील असं इंडिका ड्रायव्हरचं नाव आहे. मात्र, याप्रकरणी काहीही संबंध नसल्याचा दावा दिनेश बाहेतीनं केलाय.
 
 
अर्धापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींवर निवडणुकीत पैसे वाटण्याच्या उद्देशाचे कलम लावण्यात आलेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच नोट फॉर व्होटचे हे प्रकरण घडल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे

First Published: Friday, December 9, 2011, 10:16


comments powered by Disqus