‘त्या’ मातेला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक... - Marathi News 24taas.com

‘त्या’ मातेला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक...

www.24taas.com, जळगाव
 
कौटुंबिक वादातून चिमुरडीला जिवंत जाळणाऱ्या निर्दयी मातेविरोधात अखेर निंभोरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या तांदळवाडीत घडलेल्या या घटनेला झी २४ तासनं सर्वप्रथम वाचा फोडली होती.
 
झी २४ तासच्या वृत्तानंतर निंभोरा पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करून सहा महिन्यांच्या दर्शिकाला चौधरी या चिमुरडीला झोळीतच जाणणाऱ्या रुपाली चौधरी या तिच्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि तिला अटकही केलीय. ९० टक्के होरपळेलेल्या चिमुरडीचा जळगाव जिल्हा रुग्णालयात नेताना दुर्दैवी अंत झाला होता. सुन्न करणाऱ्या या घटनेची पोलिसांनी अगोदर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. पण, आता आपल्याच मुलीला क्रूर पद्धतीनं ठार मारणाऱ्या मातेविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. सासू सासरे तसंच पती घराबाहेर असताना तिनं रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
 
.

First Published: Thursday, June 28, 2012, 13:00


comments powered by Disqus