बाबा पैशाचा पाऊस पाडतोय.... - Marathi News 24taas.com

बाबा पैशाचा पाऊस पाडतोय....

www.24taas.com, विशाल करोळे, औरंगाबाद
 
पैशांचा पाऊस पाडणारा एक भोंदूबाबा सध्या मराठवाड्याच्या राजधानीत अवतरला आहे.  काय धक्का बसला ना ? अहो ज्या मराठवाड्यावर वरुणराजाही रुसला आहे. त्या मराठवाड्यात आता पैशांचा पाऊस पाडण्याचा उद्योग एक भामटा करतो आहे. नरेंद्र चौधरी नावाचा भामटा मराठवाड्यात म्हणे पैशांचा पाऊस पाडणार होता.
 
त्यासाठी जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि बुलढाण्याहून १५ जण दौलताबादच्या किल्ल्याजवळील एका आश्रमात जमले होते. भोंदूबाबानं पूजेची सर्व तयारीही केली होती. लोकही या भामट्याच्या भूलथापांना बळी पडून पैशांच्या पावसाची वाट पाहत होते. मात्र पैशांचा पाऊस तर झालाच नाही पण पोलिसांनीच या भामट्याचं पितळ उघड पाडलं.
 
आश्चर्य म्हणजे पैशांच्या आमिषानं जमलेल्या लोकांमध्ये एक पोलीस अधिकारी, आणि काही पत्रकारांचाही समावेश होता. तर हा भोंदूबाबा व्यवसायानं ऑटोमोबाईल इंजिनिअर असल्याचा दावा करतो आहे. मात्र या सर्व प्रकारातून सुशिक्षित लोक अंधश्रद्धा आणि भूलथापांना कसे बळी पडतात याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 28, 2012, 17:09


comments powered by Disqus