Last Updated: Friday, June 29, 2012, 12:16
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादच्या वाळूज रांजनगाव परिसरातील पूजा नर्सिंग होमच्या डॉक्टरांविरोधात स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी डॉक्टर महेंद्र जैन यांना अटक करण्यात आलीय. तर तीन डॉक्टर फरार आहेत.
फरार म्हणून घोषित करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. संध्या पंतोजी, डॉ. भाग्यश्री दुनाखे आणि डॉ. माधुरी कोठारे यांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. याच संशयावरुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच हे हॉस्पिटल सील केलं होतं. त्यानंतर पोलीस तपासात डॉक्टरांचा काळा धंदा समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
First Published: Friday, June 29, 2012, 12:16