अनाथ आश्रमातील मुलींवर गॅंगरेप... - Marathi News 24taas.com

अनाथ आश्रमातील मुलींवर गॅंगरेप...

www.24taas.com, औरंगाबाद
 
औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडली आहे. बुधवार रात्रीपासून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे.
 
औरंगाबाद मधील मुकुंदनगर भागातील विद्यावती अनाथालयातील दोन मुली परवापासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोधही सुरू होता. दोन मुलींपैकी एका मुलीवर चारजणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समजते. आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
 
अनाथआश्रमातील मुली ह्या सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर या  बलात्कारप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. औरंगाबादच्या विद्यावती आश्रमातील दोनही मुली एकाचवेळी बेपत्ता झाल्या होत्या.
 
 
 

First Published: Friday, July 6, 2012, 11:47


comments powered by Disqus