आणखी 11 सोनोग्राफी सेंटर्स सील - Marathi News 24taas.com

आणखी 11 सोनोग्राफी सेंटर्स सील

www.24taas.com, औरंगाबाद
 
महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकांनी धडक कारवाई करत औरंगाबाद शहरातील 11 सोनोग्राफी सेंटरला सील केलंय. यात स्वत:ला व्हाईट कॉलर म्हणवणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या सोनोग्राफी सेंटरचा समावेश आहे.
 
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा या पथकांनी सोनोग्राफी सेंटरची चेकींग सुरु केली. रेकॉर्ड न ठेवणे, मशिन्सच्या तांत्रिक नोंदी नसणे आदी कारणांवरून ही कारवाई केली जात आहे. 35 सोनोग्राफी सेंटर्सना कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आली आहे. तर 28 गर्भपात केंद्रांची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची सोनोग्राफी सेंटरवरील कारवाईबाबत बैठक घेतली आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेनं ही कारवाई केलीय. यात बेकायदा गर्भपात, गर्भलिंगचाचणी करणाऱ्या डॉक्टरांची माहिती दिल्यास 25 हजारांचं बक्षीसही विभागीय आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलंय.
 

First Published: Friday, July 6, 2012, 12:58


comments powered by Disqus