माताच बनली वैरीण... - Marathi News 24taas.com

माताच बनली वैरीण...

www.24taas.com, औरंगाबाद 
 
कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावून टाकणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडलीय. राज्यात सध्या स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार गाजत असताना माताच लेकीची वैरीण बनल्याचं औरंगाबादमध्ये उघड झालंय.
 
घाटी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेली माता आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या मुलीला सोडून पळाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. रंजना साबळे हिला तीन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसूतीनंतर तिच्यावर उपचार सुरु होते. त्यासाठी तिला गुरुवारी खालच्या मजल्यावर आणण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर ती वॉर्डात परतली नाही. याबाबत घाटी रुग्णालय प्रशासनानं बेगमपुरा पोलीस तक्रार दाखल केलीय. मुलीला सोडून जाताना रुग्णालयाचे पेपर्स घेऊन जाण्याचं मात्र ही माता विसरलेली नाही.

First Published: Saturday, July 7, 2012, 18:56


comments powered by Disqus