Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:09
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला स्वत:च्याच घरात डांबण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या वृद्ध दाम्पत्याला घरात कोंडणारा दुसरा-तिसरा कोणी नसून हा त्यांचाच भाडेकरू आहे.
ठराविक वर्षाचा करार संपल्यानं घरमालक किशोर सरोदे यांनी किसन नागरे याला घर सोडण्यास सांगितले. मात्र, नागरेनं घर सोडण्याऐवजी आपण पोलीस असल्याची बतावणी करून या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच घरात डांबून ठेवण्याचा महाप्रताप केला. भेदरलेल्या अवस्थेत या दाम्पत्यानं आरडाओरड केली मात्र मदतीला कुणीही धावून आले नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानं हे दाम्पत्य खोलीतून सुटले. मात्र, या सर्व प्रकरामुळं घाबरलेल्या किशोर सरोदे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पत्नी अपर्णा सरोदेंनी शेजाऱ्यांच्या मदतीनं किशोर सरोदेंना दवाखान्यात दाखल केलं.
First Published: Wednesday, July 11, 2012, 14:09