Last Updated: Thursday, July 12, 2012, 16:23
www.24taas.com, परभणी परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणा-या दोन मुलांचं अपहरण केलं.
अपहरणकर्त्यांनी या दोन मुलांना परभणीला आणलं. परभणी रेल्वे स्टेशनवर संशयास्पद हालचालींमुळे या भामट्यांची पोलिसांनी चौकशी करायला सुरवात केली. मात्र, विचारपूस करण्याचा प्रयत्न करत असतानाच या भामट्यांनी तिथून पळ काढला.
रेल्वे पोलिसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अपहरणाच्या या प्रकारामुळे मराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागालय.
First Published: Thursday, July 12, 2012, 16:23