क्राइम ब्रांच काढतेय अबू जिंदालची माहिती - Marathi News 24taas.com

क्राइम ब्रांच काढतेय अबू जिंदालची माहिती

www.24taas.com, औरंगाबाद
 
२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अबु जिंदालने क्राइम ब्रांचचा तपासात खुलासा केलाय. 2006 साली औरंगाबादमध्ये हत्यारांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर अबु जिंदाल हा मालेगांवला पळून गेला होता. तिथं तो एका मित्राच्या मदतीनं मशिदीत थांबला. मालेगांवमधील या मशिदीमध्ये अबु जिंदालची चांगली राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
 
मालेगांवनंतर अबु जिंदाल कोलकाताला पळून गेला...कोलकातातही काही दिवस राहिल्यानंतर अबु जिंदाल बांग्लादेशला पळाला. बांग्लादेशमध्ये पाकिस्तानच्या एका एजंसीने अबु जिंदालचा बनावट पासपोर्ट तयार केला आणि याच पासपोर्टचा मदतीने अबु जिंदाल कराचीला गेला.
 
मालेगावामध्ये अबु जिंदालला मदत करणा-या आरोपीचा शोध मुंबई क्राइम ब्रांचने सुरु केलाय. ही व्यक्ती कोण आहे? याचेही दहशतवाद्यांशी संबध होते का? जिंदालचा मराठवाडा दहशतवादी नेटवर्कशी या व्यक्तीचे संबध आहेत का? आता हा व्यक्ती काय करतोय? कुठे राहतो हे? हे सगळं शोधून काढण्याच काम क्राइम ब्रांचनं सुरु केलंय..

First Published: Wednesday, July 25, 2012, 22:21


comments powered by Disqus