पैसे दिले नाही, आईचा केला खून - Marathi News 24taas.com

पैसे दिले नाही, आईचा केला खून

www.24taas.com, अंबाजोगाई 
 
अंबाजोगाई येथे मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी चार लाख रुपये देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईचा खून केला. या वेळी आईला वाचविण्यास गेलेल्या बहिणीवरही चाकू हल्ला केल्याने तीही जखमी झाली.
 
गजानंद सोमनाथ चौधरी (वय २३) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मेकॅनिकल विषयात अपयश आल्याने गेल्या काही दिवसांपासून खासगी व्यवसायासाठी चार लाख रुपयांची मागणी तो आई सुरेखाकडे करीत होता. खानावळ चालवून सुरेखा चौधरी यांनी दोन मुलींचे लग्न केले होते.
 
तिसरी मुलगी सीमाचे शिक्षण सुरू असल्याने व तिच्याही लग्नासाठी पैसा उभा करणे गरजेचे असल्याने आईने गजानंदला काही दिवस थांबण्याचे  वेळोवेळी सांगितले, परंतु मुलाचा तगादा सुरूच होता. ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गजानंद याने रागाच्या भरात आईवर चाकूने वार केले. या वेळी ‘आईला मारू नकोस ’ असे म्हणत   अडवण्यास गेलेल्या बहीण सीमावरही हल्ला केला.
 
 
 

First Published: Monday, August 6, 2012, 13:47


comments powered by Disqus