Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:37
www.24taas.com, औरंगाबाद 
सरकारी रूग्णालयातील अनागोंदी कारभार आणि त्यामुळे होणारा त्रास हूी बाब नित्याचीच झाली आहे. मात्र औरंगाबादमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिरंगाईमुळे महिलेची रस्त्यातच उघड्यावर प्रसूतूी झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांनी उपचार नाकारल्याने रुग्णालयासमोर उघड्यावरच महिलेची प्रसूती झाली. या घटनेने आरोग्य खात्याचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. रक्त कमी असून, येथे प्रसूती होणार नाही, असे सांगून महिलेची प्रसूती टाळली. महिलेला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
महिलेला घेऊन नातलग बाहेर आले. तेवढ्यात वेदना असह्य झाल्याने गर्भवती रस्त्यावरच आडवी झाली. नातलग भांबावले. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. साड्या, चादरी आडव्या लावल्या, पण प्रसूती कशी करावी याची माहिती नसल्याने नातेवाईक परिचारिकेला बोलावण्यास गेले. परिचारिका पोहोचण्यापूर्वीच प्रसूती झाली होती.
First Published: Thursday, August 9, 2012, 00:37