मुंडेंच्या जावयांवर अपहरणाचा गुन्हा - Marathi News 24taas.com

मुंडेंच्या जावयांवर अपहरणाचा गुन्हा

Tag:  
झी २४ तास वेब टीम, परळी
 
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडेंचे जावई आणि नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले मधुसुदन केंद्रे यांच्याविरोधात नगरसेवकाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
काँग्रेस नगरसेवक गजानन सावंत यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून पळवून नेल्याचा केंद्रेवर आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
 
निवडणुकीनंतर दुपारी साडेतीन वाजता सावंत यांना परळी रोडवर आणुन सोडण्यात आल आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केलीय. यासंदर्भात आतापर्यंत कुणलाही अटक करण्यात आली नाही.

First Published: Thursday, December 22, 2011, 08:02


comments powered by Disqus