Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:10
झी २४ तास वेव टीम, औरंगाबाद अकोल्याहून पुण्याला जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघात ३१ प्रवाशी जखमी झालेत. औरंगाबाद येथे आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
३१ प्रवाशी जखमींमध्ये २० ते २५ एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. रविवारी परीक्षा असल्याने हे विद्यार्थी पुण्याला जात होते. अकोलाहून पुण्याकडे येत असलेली बस औरंगाबादजवळील वाळूज येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.
सर्व जखमी प्रवाशांना औरंगाबादमधील शासकिय घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. बसने रस्त्याच्या बाजूला लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
First Published: Saturday, December 24, 2011, 09:10