Last Updated: Saturday, December 31, 2011, 13:36
झी २४ तास वेब टीम, धुळे धुळ्यातील अपघातात ५ ठार झालेत. हा अपघात मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ आज पहाटे झाला. ट्रक- टेम्पो- सुमो या तीन वाहनांमध्ये धडक झाली. अपघातात ८ जखमींपैकी ३ जण गंभीर आहेत.
अपघातग्रस्त तिन्ही वाहने शिरपूरकडे जात होती. ट्रकने वेग कमी केल्याने मागून येणारा आयशर धडकला. याचवेळी उज्जैन येथे संत्संगासाठी जाणारी सुमो आयशरवर धडकली. यावेळी झालेल्या अपघातात सुमोतील चार आणि आयशरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद येथील ताराबाई गोविंदकिशन लढ्ढा, रमेश गोपीकिशन लढ्ढा, पद्मजा भारूका, कांता खंडेलवाल (रा. औरंगाबाद) व अन्य एकाचा समावेश आहे. तसेच औरंगाबाद येथील सुनंदा रमेश लढ्ढा, विजय तापडिया, सुषमा गोविंदराव पाटील (औरंगाबाद), चालक आनंदा जगन्नाथ गंगावणे (फुलंबरी, औरंगाबाद), आयशरमधील शिवनंदन चांभार, शिवशंकर अवस्थी (कानपूर) हे जखमी आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यलता पोलिसांनी वर्तविली आहे.
First Published: Saturday, December 31, 2011, 13:36