Last Updated: Saturday, January 7, 2012, 20:49
www.24taas.com, नांदेड हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पती, सासू आणि जावेला नांदेड कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय सौंदते त्याची आई सोनाबाई आणि बहिण इमलबाई असं या तिघा आरोपींची नावं आहेत.
२००५ मध्ये मुदखेडमध्ये हे जळीतकांड घडलं होतं. व्यवसायानं वकील असलेल्या संजय सौंदते यांनी त्यांची पत्नी सुनिता सौदते हिचा एक लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ सुरु केला होता. त्य़ातूनच सुनिता यांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी नांदेड सेशन कोर्टानं आज तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
First Published: Saturday, January 7, 2012, 20:49