गर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास - Marathi News 24taas.com

गर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास



www.24taas.com, बीड
 
बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
सप्टेंबर २००५ मध्ये या तीनही डॉक्टरांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. अरुण सातपुते, माधव सानप आणि सय्यद अहमद अशी या तिघा डॉक्टारांची नावं आहेत. बीडच्या भगवान हॉस्पिटलमध्ये ते बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करत होते.
 
'लेक वाचवा' अभियानाअंतर्गत वर्षा देशपांडे यांनी स्टींग ऑपरेशन करून त्यांना रंगेहात पकडलं होतं. त्यांना कोर्टानं शिक्षा सुनावल्यानं भ्रूण हत्या करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

First Published: Thursday, January 12, 2012, 21:45


comments powered by Disqus