Last Updated: Friday, January 13, 2012, 16:00
www.24taas.com, औरं
गाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.
राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी गळ्यातील सोन्याचे लॉकेटही पळवल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला आहे. अपक्ष आमदार प्रशांत बंब समर्थकांनी हल्ला केल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे. गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चिडलेल्या बंब समर्थकांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
First Published: Friday, January 13, 2012, 16:00