Last Updated: Wednesday, January 18, 2012, 17:19
www.24taas.com, बीड गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.
गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. या कार्यक्रमासंदर्भात झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित होते. सहकारमंत्री प्रकाश सोळुंके यांचासोबत दिसलेल्या धनंजय मुंडेंनी यावेळी गोपीनाथ मुंडेंविरोधात वक्तव्य केलं. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत, याला गोपीनाथ मुंडे जबाबदार असून कार्यकर्त्यांना मोठं करण्याऐवजी घरात पदं वाटण्यात ते मश्गूल असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी यावेळी केला.
उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे उद्या काय बोलतात, याकडं लक्ष लागलं आहे.
First Published: Wednesday, January 18, 2012, 17:19