Last Updated: Wednesday, January 18, 2012, 18:25
www.24taas.com, नांदेड 
नांदेड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या किकी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी आपल्या आजीकडे रहायला आली असताना त्याच गावातील 20 वर्षांच्या शिवा देशमूख या युवकानं मुलीला बळजबरीनं उचलून नेत तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर युवक पळून गेला.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.दरम्यान पीडीत मुलीला उपचारासाठी नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
First Published: Wednesday, January 18, 2012, 18:25