Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:09
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादच्या बहुचर्चित मानसी देशपांडे बलात्कार आणि खून खटल्यात आरोपी जावेद खानला जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शहरातील अहिंसानगरमध्ये राहणाऱ्या मानसीचा खून जावेद खान उर्फ टिंगऱ्या या चोरानं केला.
११ जून२००९ रोजी मध्यरात्री जावेद चोरीच्या उद्देशानं मानसीच्या घरात शिरला. चोरी करीत असताना मानसीला जाग आल्यानं त्यानं मानसीचा स्क्रू ड्रायव्हर आणि कात्रीनं खून केला. त्यानंतर मानसीच्या भावाचे कपडे घालून पळ काढला. जाताना त्यानं घरातून मोबाईल आणि सोन्याची अंगठी चोरली.
प्रदीप चंडलीया या हॉटेल मालकानं आरोपी जावेदला आश्रय दिल्यानं याप्रकरणात पोलिसांनी प्रदीपलाही सहआरोपी केलं. या खून प्रकरणानंतर महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, म्हणून आंदोलन केलं होतं.
First Published: Thursday, March 22, 2012, 18:09