बीडच्या नर्सिंग कॉलेजमध्ये लैंगिक शोषण - Marathi News 24taas.com

बीडच्या नर्सिंग कॉलेजमध्ये लैंगिक शोषण

www.24taas.com, बीड
 
बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील नर्सिग कॉलेजमध्ये  लैगिक शोषण होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सचिन देशमुखना वसतीगृहातील विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
 
पोलिसांनी शांताई हॉटेलवर छापा टाकला असता, हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टर सचिन देशमुखला जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं निलंबित केलं. या शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनींचे लैगिक शोषण होत असल्याचं या प्रकारामुळे उघड झालं आहे.

First Published: Wednesday, February 1, 2012, 15:31


comments powered by Disqus