Last Updated: Thursday, February 2, 2012, 10:00
www.24taas.com, महेश पोतदार, उस्मानाबाद उस्मानाबाद जवळ वडगाव इथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एम्बुलन्स आणि एसटीच्या धडकेत पाच ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेले गंभीर असल्याने ठार झालेल्या मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

एम्बुलन्स सोलापूरहून उस्मानाबादच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. एम्बुलन्सने उस्मानाबाद सातारा बसला जोरदार धडक दिली. बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
एम्बुलन्समधील गंभीर जखमींना उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्बुलन्स कर्नाटक पासिंगची असून त्यातील प्रवासी औरंगाबाद जिल्ह्यातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एम्बुलन्समध्ये एक मृतदेह घेऊन ते औरंगाबादच्या दिशेने निघाले होते.
First Published: Thursday, February 2, 2012, 10:00