औरंगाबादेत ग्राहकांची नाणे घाटात कोंडी - Marathi News 24taas.com

औरंगाबादेत ग्राहकांची नाणे घाटात कोंडी

Tag:  
www.24taas.com, विशाल करोळे, औरंगाबाद
 
औरंगाबादच्या बाजारपेठेत एखाद्या व्यापा-याकडून वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्याकडे  सुटे पैसे शिल्लक राहिल्यासतुमच्या हाती एखादं कुपन पडेल... मात्र ते पाहून चक्रावून जाऊ नका... कारण औरंगाबादमध्ये सुट्टया पैशांच्या चणचणीला व्यापा-यांनी कूपनचा पर्याय शोधलाय.
 
सुट्ट्या पैशाऐवजी ग्राहकांना स्वतःच्या सहीचे कूपन देतात.. पुढच्या खरेदीच्या वेळीस हेच कूपन दाखवून ग्राहक त्यांचे राहिलेले पैसे मिळवू शकतात. रुपयापासून ते दहा रुपयांपर्यंतची कूपन या दुकानदारांकडे पाहायला मिळतात. याआधी सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट दिली जायची. मात्र ग्राहकांनी ती स्वीकारण्यास नकार दिल्याने ही कूपनची नामी शक्कल लढवल्याचे दुकानदार सांगतात.
 
मात्र ही कूपन फक्त त्याच दुकानदारांकडे चालत असल्याने ग्राहकांचे सुटे पैसे अडकून बसतात. त्यामुळे ग्राहक याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. सुट्ट्या पैशांसाठी दुकानदारांना अधिक कमीशन मोजावं लागतंय. त्यामुळे औरंगाबादच्या किराणा दुकान,हॉटेल, पानटपरी, कॉलेज कँटिंनमध्ये या कूपन सिस्टिमचा सर्रास वापर सुरु आहे. त्यातच बँकाकडे सुट्ट्या पैशांची मागणी आणि पुरवठा यांतही तफावत असल्याने सुट्ट्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सुट्टे देता का सुटे असे म्हणण्याची वेळ ग्राहक आणि व्यापा-यांवर आली आहे.
 

 
 

First Published: Sunday, February 5, 2012, 15:03


comments powered by Disqus